संतोष कानडे
ज्योतिषशास्त्राबद्दल प्रत्येकालाच कुतूहल असतं. भलेही त्याचा त्यावर विश्वास असो किंवा नसो.
परंतु आता आपलं भविष्य बघणं किंवा भूतकाळ बघणं सोप्प झालं आहे. तेही मोबाईलवर.
पूर्वी ज्योतिषी आपल्या हस्तरेषा बघून आपल्याबद्दल सांगायचे आणि आपल्याला ते पटायचं.
परंतु आता एआय तुमचं भविष्य सांगत आहे. तेही केवळ तुमच्या हाताचे फोटो काढून
तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला चॅट जीपीटी, जेमिनी किंवा इतर एखादं एआय अॅप घ्यायचं आहे
त्यानंतर आपल्या हाताचे फोटो काढायचे आणि चॅटमध्ये टाकायचे. त्यानंतर तुम्हाला काही क्षणात तुमच्याबद्दल माहिती मिळेल.
आजवर तुम्हाला ज्योतिषाने जसं सांगितलं असेल तशीच माहिती एआय तुम्हाला देतं. तेही अगदी मोफत.
तुमच्या रेषा तुमच्याबद्दल काय सांगतात, स्वभाव, राशी, भूतकाळ, भविष्यकाळ.. सगळंकाही यावर तुम्हाला कळतं.
त्यामुळे तुमचा विश्वास असो अथवा नसो. तुम्ही तुमचं भविष्य एका मिनिटात बघू शकता, तेही कुठे न जाता.