संतोष कानडे
मुघलांचा सगळ्यात चाणाक्ष बादशहा म्हणून औरंगजेबची ओळख आहे. याच औरंगजेबचे वंशजांचं पुढे काय झालं ते पाहूया.
मुघलांचा सगळ्यात शेवटचा आणि अधिकृत बादशहा म्हणून बाहदूरशाह जफरचा उल्लेख इतिहासकार करतात.
१८५७ च्या उठावानंतर ब्रिटिशांनी त्याला म्यानमारमध्ये कैद केलं आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अनेक वंशजांना ब्रिटिशांनी ठार केलं होतं.
बाहदूरशाह जफर याचा पणतू मिर्झा मोहम्मद बेदर बख्त याची पत्नी होती सुल्ताना बेगम. हिच्याबद्दलच हे दावे केले जातात.
मिर्झा बख्तचा १९८० मध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर सुल्ताना बेगम ही कोलकाता येथील हावडा स्टेशनबाहेर गरीबीत रहात होती.
स्टेशनबाहेर सुल्ताना ही समोसे विकत होती, असं काही लोक सांगतात. याबाबत बातम्याही प्रसिद्ध झालेल्या आहेत.
सुल्ताना ही छोट्याश्या झोपडीत रहायची. अत्यंत तुटपुंज्या पेन्शनवर म्हणजे सहा हजार रुपये महिन्यावर ती उदरनिर्वाह करायची.
दुसरीकडे हैदराबाद येथे राहणारे प्रिन्स याकूब झियाउद्दीन तुसी हा स्वतःला मुघल घराण्याचा वंशज समजतो.