Vinod Dengale
AINRC म्हणजेच All India N.R. Congress. हा पक्ष 2011 मध्ये कॉँग्रेसमधून बाहेर पडून पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री N.Rangasamy यांनी स्थापन केला.
2006 ते 2008 दरम्यान मुख्यमंत्री असताना रंगास्वामी यांना काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि दबावामुळे पक्षाच्या हायकमांडने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले होते.
या पक्षांतर्गत मतभेद आणि नेतृत्वावरील नाराजीमुळे त्यांनी काँग्रेस सोडून स्वतंत्र पक्ष स्थापन केला. त्याला AINRC हे नाव N. Rangasamy यांच्या नावावरून ठेवण्यात आलं.
त्यानंतर 2011 च्या निवडणुकीत AINRC ने काँग्रेसला सत्तेबाहेर करत रंगास्वामी मुख्यमंत्री बनले.
मात्र 2016 मध्ये कॉँग्रेसने AINRC ला सत्तेतून बाहेर केले आणि पुन्हा कॉँग्रेसचा मुख्यमंत्री बनला.
त्यानंतर 2021ला AINRC ने भाजपसोबत सत्ता स्थापन केली. 2026 च्या निकलातही हीच आघाडी सत्तेत येताना दिसत आहे.
एकेकाळी काँग्रेसमधून बाहेर पडलेला नेत्याने स्थापन केलेला पक्ष आज भाजपच्या NDA आघाडीचा महत्त्वाचा भाग बनला आहे.
Shashi Tharoor Kerala CM Chances : केरळमध्ये 'UDF'ची ऐतिहासिक मुसंडी! मुख्यमंत्री कोण होणार? शशी थरूर यांनी स्पष्टच सांगितलं
Shashi Tharoor Responds to CM Speculation
esakal