Shashi Tharoor Kerala CM Chances : केरळमध्ये 'UDF'ची ऐतिहासिक मुसंडी! मुख्यमंत्री कोण होणार? शशी थरूर यांनी स्पष्टच सांगितलं

बाळकृष्ण मधाळे

शशी थरूर यांनी मांडली भूमिका

केरळच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा रंगत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी यावर आपली भूमिका मांडली आहे.

Shashi Tharoor Responds to CM Speculation

|

esakal

पुढील मुख्यमंत्री कोण होणार?

विधानसभा निवडणुकीच्या कलांमध्ये ‘संयुक्त लोकशाही आघाडी’ (UDF) आघाडीवर असल्याने, पुढील मुख्यमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Shashi Tharoor Responds to CM Speculation

|

esakal

...तर ऐतिहासिक बहुमत मिळवणे होते

या संदर्भात बोलताना थरूर म्हणाले की, पक्षाचे मुख्य उद्दिष्ट केवळ सत्ता मिळवणे नव्हते, तर ऐतिहासिक बहुमत मिळवणे होते. सध्या मिळत असलेले कल हे त्या दिशेने सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Shashi Tharoor Responds to CM Speculation

|

esakal

मुख्यमंत्रीपदाबाबत काय म्हणाले थरूर?

मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसमध्ये नेहमीप्रमाणे निवडून आलेल्या आमदारांशी चर्चा करून आणि पक्षश्रेष्ठींच्या अंतिम निर्णयानंतरच नेतृत्व निश्चित केले जाते.

Shashi Tharoor Responds to CM Speculation

|

esakal

'मला काहीच माहिती नाही'

“या पदासाठी माझे नाव आहे की नाही, याबद्दल मला काहीच माहिती नाही. आमच्याकडे सक्षम नेतृत्वाची कमतरता नाही, ही आमची ताकद आहे,” असेही त्यांनी सांगितले.

Shashi Tharoor Responds to CM Speculation

|

esakal

UDF ची ९५ जागांवर आघाडी

थरूर पुढे म्हणाले की, सध्याच्या कलांनुसार UDF सुमारे ९५ जागांवर आघाडीवर आहे, जी कामगिरी बऱ्याच काळानंतर पाहायला मिळत आहे. अधिकृत निकालांची पुष्टी मिळण्याची पक्ष आतुरतेने वाट पाहत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Shashi Tharoor Responds to CM Speculation

|

esakal

बहुमताचं सरकार स्थापन होणार!

थरूर यांनी शेवटी विश्वास व्यक्त केला की, हे निकाल अपेक्षेपेक्षा अधिक चांगले ठरतील आणि UDF सहजपणे बहुमताचे सरकार स्थापन करेल.

Shashi Tharoor Responds to CM Speculation

|

esakal

PM Modi Playing Football With Children : PM मोदींचा 'स्वॅग'! गंगटोकमध्ये मुलांसोबत रंगला फुटबॉलचा सामना; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'खेला होबे'

PM Narendra Modi Plays Football With Children

|

esakal

येथे क्लिक करा...