विमानात एअर होस्टेस कुठे आराम करतात?

Shubham Banubakode

क्रू मेंबर

फ्लाइटमध्ये काही तासांनी एअर होस्टेस दिसेनाशी होते आणि तिच्या जागी दुसरा क्रू मेंबर प्रवाशांची सेवा करताना दिसतो.

air hostess rest compartment

|

esakal

खास जागा

विमानात क्रू मेंबर्सना आराम करण्यासाठी खास जागा असते. तिला क्रू रेस्ट कम्पार्टमेंट किंवा क्रू रेस्ट एरिया म्हटलं जातं.

air hostess rest compartment

|

esakal

कुठं असते सीआरसी?

मोठ्या विमानांमध्ये ही जागा अनेकदा पॅसेंजर केबिनच्या वरच्या भागात तयार केलेली असते.

air hostess rest compartment

|

esakal

सहज दिसत नाही

क्रू रेस्ट एरिया प्रवाशांच्या नेहमीच्या जागेपासून वेगळा असतो. त्यामुळे विमानात प्रवास करताना ही जागा आपल्याला सहज दिसत नाही.

air hostess rest compartment

|

esakal

जायला शिडी

या भागात जाण्यासाठी विमानात छोटी जिन्यासारखी शिडी असते. बाहेरून पाहिलं तर हा भाग अगदी काही नसल्यासारखा वाटतो.

air hostess rest compartment

|

esakal

छोटे बंक

क्रू रेस्ट एरिया म्हणजे मोठी खोली नाही. आत अनेक छोटे बंक असतात, जिथे क्रू मेंबर काही वेळ निवांत झोपू शकतात.

air hostess rest compartment

|

esakal

व्यवस्था

या छोट्या जागेत गादी, वाचनासाठी लाईट, हवा खेळती ठेवण्याची व्यवस्था आणि सामान ठेवण्यासाठी छोटी जागाही असते.

air hostess rest compartment

|

esakal

रेस्ट पीरियड

१२ ते १५ तासांच्या फ्लाइटमध्ये क्रू सतत काम करत नाही. ठरलेल्या रेस्ट पीरियडमध्ये ते इथे आराम करतात.

air hostess rest compartment

|

esakal

एक किलो साखर बनवायला किती ऊस लागतो?

Sugar

|

esakal

हेही वाचा -