Aarti Badade
वायू प्रदूषणामुळे धूळ आणि धूर डोळ्यांच्या संपर्कात येतात, ज्यामुळे जळजळ, खाज सुटणं, डोळे लाल होणं आणि पाणी येणं असे प्रकार होतात.
Sakal
प्रदूषणामुळे डोळ्यांत जडपणा, दृष्टी धूसर होणं, लालसरपणा, सूज आणि वारंवार खाज सुटणं अशा समस्या वाढतात.
Sakal
चष्मा किंवा गॉगल्स वापरणे हा डोळ्यांचं हानिकारक किरणांपासून आणि धूळ-धुरापासून रक्षण करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे (वापरण्यापूर्वी नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या).
Sakal
बाहेरून आल्यावर डोळ्यांतील घाण काढून टाकण्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने डोळे धुवा आणि संसर्गाचा धोका कमी करा.
Sakal
प्रदूषणादरम्यान डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी Eye Drops वापरू शकता, पण कोणतेही ड्रॉप्स खरेदी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Sakal
डोळ्यांची आर्द्रता (Moisture) टिकवून ठेवण्यासाठी आणि अनेक समस्या टाळण्यासाठी नियमितपणे पुरेसे पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे.
Sakal
वायू प्रदूषणापासून घराचं संरक्षण करण्यासाठी एअर प्युरिफायर (Air Purifier) हा एक चांगला पर्याय आहे, ज्यामुळे तुमच्या घराची हवा स्वच्छ राहील.
Sakal
Sakal