Anushka Tapshalkar
खराब हवेच्या गुणवत्तेमुळे मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो, ज्यामुळे चिडचिड, लालसरपणा आणि दीर्घकालीन समस्या निर्माण होतात.
धूळ आणि धूर यांसारख्या प्रदूषकांमुळे डोळ्यांमध्ये खाज सुटणे आणि जळजळ होणे या समस्या उद्भवतात.
उच्च AQI पातळीमुळे डोळ्यांमध्ये लालसरपणा आणि सूज येऊ शकते, ज्यामुळे डोळे रक्ताळल्यासारखे दिसू शकतात.
प्रदूषित हवेच्या सतत संपर्कामुळे डोळ्यांतील अश्रूंची नैसर्गिक निर्मिती कमी होऊ शकते, ज्यामुळे डोळे कोरडे आणि अस्वस्थ वाटू लागतात.
हवेतील जीवाणू आणि विषाणू डोळ्यांच्या पुढील भागाला (कॉर्नियाला) संसर्ग होण्याचा धोका वाढवतात.
धुके आणि त्यातील बारीक कण ज्यामुळे ऍलर्जी होऊ शकते यांमुळे मुलांच्या डोळ्यांमध्ये सूज येऊशकते आणि सतत डोळ्यातून पाणी येणे अशा समस्या उद्भवू शकतात.
दीर्घकाळ खाज सुटणे आणि डोळ्यांवरचा ताण यामुळे दृष्टी धूसर होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य प्रभावित होऊ शकते.
प्रदूषित हवेशी डोळ्यांचा सतत संपर्क झाल्यास दीर्घकाळात डोळ्यांच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यात दृष्टी कमी होणे, इन्फेकशन किंवा इतर डोळ्यांचे विकार यांचा समावेश असतो.