Anushka Tapshalkar
तुमचे केस लांब, मजबूत आणि निरोगी बनवण्यासाठी तुम्ही घरच्या घरीच सोपे व नैसर्गिक हेअर मास्क तयार करू शकता. हे हेअर मास्क पूर्णपणे नैसर्गिक असल्याने त्यामुळे कोणतीही हानी होत नाही.
अंड्यामध्ये भरपूर प्रथिने असतात आणि दही, मॉइश्चरायझेशन आणि स्कॅल्पच्या नैसर्गिक तेलांचे संतुलन राखण्यास मदत करते. 1 अंडे आणि 2 मोठे चमचे साधे दही एकत्र करा आणि ते मिश्रण तुमच्या टाळूला चमक आणि आकारमानासाठी लावा.
केळी केसांची लवचिकता टिकवण्यास, स्प्लिट एंड्स कमी करण्यास आणि स्काल्प निरोगी ठवेण्यास मदत करतात. एक पिकलेले केळे मॅश करा आणि त्यात 1 चमचे मध मिसळा.
केसांच्या निरोगी वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी कोरफड हा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. 2 चमचे ॲलोवेरा जेल 1 चमचा नारळाच्या तेलात मिसळा. हा मास्क तुमचा स्काल्प पुन्हा टवटवीत करण्यास मदत करतो.
तुमचे केस राठ व कमकुवत होऊन सतत तुटत असतील तर हा मास्क नक्की वापरा. 1 केलं व 2 चमचे ऑलिव्ह ऑइल एकत्र करून हा मास्क तयार करा.
खोबरेल तेल नैसर्गिक कंडिशनर आहे, ज्यामुळे केसांना पोषण मिळते. तर मधामुळे केसातील मोईस्चर टिकून राहते. या मास्कमुळे तुमचे केस गुळगुळीत, चमकदार राहण्यास मदत होते.
मेंदी केवळ नैसर्गिक हेअर डाय नसून ती केसांच्या मजबूतीला आणि बांधील प्रोत्साहन देते. केसांची गळती कमी करून केस दाट व चमकदार करण्यासाठी हा हेअर मास्क वापरा.