गाडीतल्या एअरबॅग उघडायला किती वेळ लागतो?

संतोष कानडे

महागड्या गाड्या

सुरक्षेच्या कारणास्तव महागड्या गाड्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. सेफ्टी फिचर्सचा अभ्यास करुन गाडी घेतली जाते.

अपघात

तरीही भारतात अपघातांचं आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी झालेलं नाही. दररोज कुठेना कुठे अपघात होतच असतो.

आर.टी. देशमुख

परवा बीडच्या माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचा अपघात झाला आणि त्यात ते दगावले.

चिंतेची बाब

त्यामुळे पुन्हा एकदा वाहन सुरक्षेवर चर्चा होत आहेत. गाडीमध्ये एअरबॅग असूनही जीव जात असतील तर ती चिंतेची बाब आहे.

सुरक्षा प्रणाली

एअरबॅग ही वाहनातील एक महत्त्वाची सुरक्षा प्रणाली आहे, जी अपघाताच्या वेळी काही मिलिसेकंदांत कार्यान्वित होते.

३० मिलिसेकंद

अपघात होताच एअरबॅग फक्त ३० मिलिसेकंदात (0.03 सेकंद) म्हणजे ३२१ किलोमीटर प्रतितास या प्रचंड वेगाने उघडते. हा वेग माणसाच्या डोळे मिचकवण्यापेक्षा १० पट अधिक आहे.

कंट्रोल युनिट

गाडीतील सेन्सर्स जेव्हा जोरदार धक्का ओळखतात, तेव्हा ते लगेच कंट्रोल युनिटला सिग्नल देतात.

नायट्रोजन गॅसचा स्फोट

त्या सिग्नलवरून एअरबॅग्समध्ये नायट्रोजन किंवा तत्सम गॅसचा स्फोट घडतो आणि बॅग फुगते.

स्टीअरिंग व्हील

ही बॅग स्टीअरिंग व्हील, डॅशबोर्ड, सीट्स किंवा दरवाज्यांमध्ये बसवलेली असते.

जबरदस्त आघात

प्रवाशाच्या डोक्याला, छातीकडे किंवा चेहऱ्यावर होणाऱ्या जबरदस्त आघाताला रोखणे, या एअरबॅगचा उद्देश असतो.

एअरबॅग्ज

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एअरबॅग्ज यंत्रणा फक्त सीट बेल्ट वापरल्यासच योग्य रितीने काम करतात. ही माहिती सोशल मीडियातून घेतलेली आहे.

काश्मिरी महिलांच्या अंतर्वस्त्रांवर औरंगजेबाने लावले होते नियम

mughal harem | esakal
<strong>येथे क्लिक करा</strong>