विमानाच्या सीटवर त्रिकोणी खूण का असते? अनेकांना खरं कारण माहीतच नाही

Yashwant Kshirsagar

त्रिकोणी खूण

विमान प्रवास करताना अनेक प्रवाशांनी सीटच्या वरच्या बाजूला खिडकीजवळ काळ्या रंगाची त्रिकोणी खूण पाहिली असेल. मात्र, या खुणेचा नेमका अर्थ अनेकांना माहीत नसतो.

Triangle Above Airplane Seat

|

esakal

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची

विमानातील त्रिकोणी खूण ही केवळ सजावटीसाठी नसते. वैमानिक आणि केबिन क्रू यांना विमानाच्या पंखांचे निरीक्षण करण्यासाठी या खुणेचा उपयोग होतो.

Triangle Above Airplane Seat

|

esakal

विमानाच्या पंखांच्या रेषेत

'रीडर्स डायजेस्ट'च्या माहितीनुसार, विमानातील ही त्रिकोणी खूण ज्या खिडकीजवळ असते, त्या खिडकीतून विमानाचे पंख अधिक स्पष्टपणे दिसतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना निरीक्षणासाठी योग्य जागा समजते.

Triangle Above Airplane Seat

|

esakal

पंखांची तपासणी करणे का गरजेचे?

विमान हजारो फूट उंचीवरून प्रवास करत असते. अशा वेळी विमानाच्या पंखांची स्थिती तपासणे महत्त्वाचे असते. पंखांमध्ये काही तांत्रिक बिघाड आहे का, यावरही कर्मचाऱ्यांचे लक्ष असते.

Triangle Above Airplane Seat

|

esakal

फ्लॅप्स आणि स्लॅट्स

विमानाच्या पंखांवरील फ्लॅप्स (Flaps) आणि स्लॅट्स (Slats) हे हलणारे महत्त्वाचे भाग आहेत. विमानाच्या उड्डाणासाठी आणि सुरक्षित लँडिंगसाठी त्यांची योग्य स्थिती असणे आवश्यक असते.

Triangle Above Airplane Seat

|

esakal

पंखांवर बर्फ

अतिथंड वातावरणात विमानाच्या पंखांवर बर्फ साचण्याची शक्यता असते. त्यामुळे पंखांवर बर्फ जमा झाला आहे का, याचे निरीक्षण करण्यासाठीही या खुणेचा उपयोग होतो.

Triangle Above Airplane Seat

|

esakal

प्रत्येक खिडकीतून निरीक्षण करणे शक्य नाही

विमानातील प्रत्येक खिडकीतून पंखांचा संपूर्ण भाग स्पष्ट दिसेलच असे नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना योग्य दृश्य मिळवण्यासाठी प्रत्येक खिडकी तपासण्याची गरज पडू शकते.

Triangle Above Airplane Seat

|

esakal

उपाय

प्रत्येक खिडकीजवळ जाऊन पंख तपासल्यास प्रवाशांना असुविधा होऊ शकते. त्यामुळे सर्वात योग्य दृश्य देणाऱ्या खिडकीची निवड करून तिच्यावर त्रिकोणी खूण केली जाते.

Triangle Above Airplane Seat

|

esakal

कर्मचाऱ्यांचा वेळ वाचतो

या त्रिकोणी खुणेमुळे पायलट किंवा केबिन क्रूला पंखांचे निरीक्षण करण्यासाठी नेमक्या कोणत्या खिडकीचा वापर करायचा, हे लगेच समजते. त्यामुळे वेळ वाचण्यास मदत होते.

Triangle Above Airplane Seat

|

esakal

महत्त्वाचा उपयोग

विमानातील अशा छोट्या खुणांमागेही विशिष्ट कारण असते. प्रवाशांना साधी वाटणारी त्रिकोणी खूण प्रत्यक्षात विमान कर्मचाऱ्यांना पंखांचे निरीक्षण करण्यासाठी मदत करणारी महत्त्वाची खूण आहे.

Triangle Above Airplane Seat

|

esakal

मुंबईच्या हृदयात वसलंय २८ घरांचं अनोखं गाव; पाहायला परदेशातून येतात लोक

Khotachiwadi Heritage Village

|

esakal

येथे क्लिक करा