Yashwant Kshirsagar
मुंबई म्हटलं की उंचच उंच इमारती, गर्दी आणि धावपळीचं जीवन डोळ्यांसमोर येतं. मात्र, याच मुंबईत एक असं गाव आहे, जिथे पोहोचल्यावर आपण परदेशात आल्याचा भास होतो. या गावाचं नाव आहे खोताचीवाडी!
Khotachiwadi Heritage Village
esakal
दक्षिण मुंबईतील गिरगाव परिसरात, मलबार हिलच्या पायथ्याशी खोताचीवाडी वसलेली आहे. शहराच्या गजबजाटातही या गावाने आपली स्वतंत्र ओळख आणि ऐतिहासिक वारसा आजही जपला आहे.
Khotachiwadi Heritage Village
esakal
या गावाचं नाव वामन हरी 'खोत' यांच्या नावावरून पडलं आहे. त्यांनी ही जमीन लहान-लहान भूखंडांमध्ये विभागली आणि ईस्ट इंडियन ख्रिश्चन समाजातील लोकांना विकली. त्यातून या वैशिष्ट्यपूर्ण वस्तीचा विस्तार झाला.
Khotachiwadi Heritage Village
esakal
गिरगाव परिसर एकेकाळी मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी आणि पाथरे प्रभू समाजाच्या लोकांची वस्ती होती. त्यामुळे या परिसराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झालं आहे.
Khotachiwadi Heritage Village
esakal
खोताचीवाडीतील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे येथील पारंपरिक पोर्तुगीज शैलीतील घरे. लाकडी बाल्कनी, वैशिष्ट्यपूर्ण दरवाजे, खिडक्या आणि जुन्या बांधकामाची रचना या घरांना एक वेगळीच ओळख देते.
Khotachiwadi Heritage Village
esakal
या गावातील घरे वेगवेगळ्या आकर्षक रंगांनी रंगवलेली आहेत. घरांची अनोखी रचना आणि सुंदर सजावट पर्यटकांना आकर्षित करते. प्रत्येक घराची वास्तुशैली आणि बाह्यरूप पाहण्यासारखं आहे.
Khotachiwadi Heritage Village
esakal
एकेकाळी खोताचीवाडीमध्ये अशा प्रकारची सुमारे ६५ घरे होती. मात्र, शहरीकरण आणि पुनर्विकासामुळे अनेक जुन्या वास्तू पाडण्यात आल्या. त्यामुळे आता या ऐतिहासिक घरांपैकी केवळ २८ घरे शिल्लक असल्याची माहिती आहे.
Khotachiwadi Heritage Village
esakal
खोटाचीवाडीचं सौंदर्य केवळ भारतीयांनाच नाही, तर परदेशी पर्यटकांनाही आकर्षित करतं. येथील रंगीबेरंगी घरे आणि पोर्तुगीज वास्तुकला पाहण्यासाठी अनेक पर्यटक भेट देतात. घरांसमोर फोटो काढण्याचा मोह त्यांनाही आवरत नाही.
Khotachiwadi Heritage Village
esakal
आजही खोटाचीवाडीमध्ये राहणारे अनेक नागरिक हे मुंबईच्या मूळ रहिवाशांचे वंशज आहेत. त्यामुळे या परिसरात केवळ जुन्या वास्तूच नाहीत, तर मुंबईचा इतिहास, परंपरा आणि संस्कृतीही जिवंत आहे.
Khotachiwadi Heritage Village
esakal
मुंबईच्या गजबजाटापासून वेगळं, शांत आणि ऐतिहासिक वातावरण अनुभवायचं असेल, तर खोताचीवाडीला नक्की भेट द्या. पोर्तुगीज शैलीतील रंगीबेरंगी घरं आणि जुन्या काळाची आठवण करून देणाऱ्या गल्ल्या तुम्हाला नक्कीच मंत्रमुग्ध करतील!
Khotachiwadi Heritage Village
esakal
How Do Birds Hear
esakal