Apurva Kulkarni
यंदा ऐश्वर्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये उशीरा सहभागी झाली. परंतु तिने सर्वांचं मन जिंकलं आहे.
यंदा ऐश्वर्याने कानमध्ये पारंपारिक लूक परिधान केला होता. तिच्या लूकमधून भारतीय संस्कृतीचं दर्शन घडत होतं.
मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली पांढऱ्या रंगाची बनारसी साडी परिधान केली होती. साडीला सोनेरी आणि चंदेरी काढ होते.
साडीवर ऐश्वर्याने 500 कॅरेटच डायमंड नेकलेस सुद्धा घातलं होतं. ते तिच्या लूकला शोभून दिसत होतं.
या सगळ्यात तिचा देसी लूकला कारण ठरलं ते तिने भांगेत भरलेलं कुकू... यातून ऐश्वर्याने 'ऑपरेशन सिंदूर'विषयी आदर व्यक्त केलाय.
तसंच तिच्या भांगेत कुकू भरण्याने अभिषेकसोबत घटस्फोटाच्या चर्चांना देखील पुर्णविराम मिळाला आहे.
सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचे कानमधील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.