अजिंठा लेण्या किती वर्षे जुन्या आहेत?

Varsha Balhe

अजिंठा लेणी

महाराष्ट्रातील अजिंठा लेणी जगभर प्रसिद्ध आहेत. या लेण्यांमध्ये सुंदर चित्रं आणि दगडात कोरलेल्या मूर्ती पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहिती आहे का, या लेण्या नेमक्या किती वर्षांपूर्वी तयार करण्यात आल्या?

How Old Are the Ajanta Caves?

|

esakal

पहिला टप्पा

अजिंठा लेण्यांचं सुरुवातीचं काम इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात सुरू झालं. या काळात बौद्ध धर्मातील हीनयान पंथाशी संबंधित लेणी तयार करण्यात आली.How Old Are the Ajanta Caves?

How Old Are the Ajanta Caves?

|

esakal

दुसरा टप्पा

यानंतर इसवी सनाच्या पाचव्या आणि सहाव्या शतकात लेण्यांचं काम पुन्हा सुरू झालं. या काळात बौद्ध धर्मातील महायान पंथाशी संबंधित लेणी तयार करण्यात आली.

How Old Are the Ajanta Caves?

|

esakal

लेण्यांमध्ये काय पाहायला मिळतं?

अजिंठा लेण्यांमध्ये भगवान बुद्धांच्या जीवनातील प्रसंग दाखवणारी चित्रं पाहायला मिळतात. तसेच बुद्धांच्या मूर्ती, दगडात कोरलेले खांब आणि सुंदर नक्षीकामही आहे.

How Old Are the Ajanta Caves?

|

esakal

एकूण किती लेणी आहेत?

अजिंठा येथे एकूण ३० लेणी आहेत. ही सर्व लेणी डोंगरातील दगड कोरून तयार करण्यात आली आहेत.

How Old Are the Ajanta Caves?

|

esakal

युनेस्कोचा दर्जा

अजिंठा लेण्यांना १९८३ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं. त्यामुळे या लेण्यांना जगभरात विशेष ओळख मिळाली आहे.How Old Are the Ajanta Caves?

How Old Are the Ajanta Caves?

|

esakal

किती वर्षे जुन्या?

अजिंठा लेण्या साधारण १,५०० ते २,२०० वर्षे जुन्या आहेत. या लेण्या एकाच वेळी तयार झालेल्या नाहीत. त्यांचं काम दोन वेगवेगळ्या काळात झालं आहे.

How Old Are the Ajanta Caves?

|

esakal

सांगलीची कृष्णा नदी आटल्यानंतर काय सापडलं?

Why Has the Water Level in Krishna River Dropped?

|

esakal

येथे क्लिक करा