IPL मध्ये सर्वाधिकवेळा शून्यावर आऊट होणारे 'ओपनर'

Pranali Kodre

आयपीएल रेकॉर्ड्स

आयपीएलमध्ये अनेक रेकॉर्ड्स जवळपास रोज बनतात अन् रोज तुटतात. पण काही रेकॉर्ड्स असे असतात जे आपल्या नावावर झालेले एकाही खेळाडूला अजिबातच आवडणार नाहीत.

Most Ducks as Opener in IPL

|

Sakal

सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होणारा सलामीवीर

असाच एक रेकॉर्ड म्हणजे आयपीएलमध्ये सर्वात जास्त वेळा शून्यावर बाद होणारा सलामीवीर.

Most Ducks as Opener in IPL

|

Sakal

सलामीवीर

आयपीएलमध्ये सलामीवीराला मोठी खेळी करण्याची संधी सर्वाधिक असते असं म्हटलं जातं, कारण त्याच्याकडे २० षटके असतात. मात्र जर सलामीवीरच शून्यावर आऊट झाला, तर मात्र संघावर बऱ्याचदा दबाव वाढतो.

Most Ducks as Opener in IPL

|

Sakal

कोण आहे तो सलामीवीर?

पण तुम्हाला माहितीये का असा आयपीएलमध्ये सर्वात जास्त वेळा शून्यावर आऊट होणारा सलामीवीर कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अजिंक्य रहाणे.

Ajinkya Rahane

|

Sakal

बर्गरने केलं रहाणेला बाद

नुकतेच आयपीएल २०२६ मध्ये १९ एप्रिलला झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात सलामीला आलेल्या राहणेला नांद्रे बर्गरनं शून्यावर आऊट केलं.

Ajinkya Rahane

|

Sakal

१२ वी वेळ

सलामीवीर म्हणून 'डक'वर आऊट होण्याची रहाणेची ही १२ वी वेळ ठरली आहे. याआधी १२ वेळा कोणताही सलामीवीर १२ वेळा शून्यावर बाद झालेला नाही.

Ajinkya Rahane

|

Sakal

दुसरा क्रमांक

आत्तापर्यंत तरी म्हणजे २० एप्रिल पर्यंत तरी या नकोशा विक्रमाच्या यादीत रहाणे पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर पार्थिव पटेल आहे, जो ११ वेळा शून्यावर बाद झाला.

Parthiv Patel

|

Sakal

शिखर धवन - गौतम गंभीर

शिखर धवन आणि गौतम गंभीर सलामीला खेळताना प्रत्येकी १० वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

Shikhar Dhawan - Gautam Gambhir

|

Sakal

डेव्हिड वॉर्नर

डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये सलामीला खेळताना ९ वेळा शून्यावर बाद झाला.

David Warner

|

Sakal

RCB चा मोठा पराक्रम! IPL इतिहासात असं करणारा पहिलाच संघ

RCB's 100th game at Chinnaswamy Stadium

|

Sakal

येथे क्लिक करा