सकाळ डिजिटल टीम
अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांची प्रेमकहाणी मुंबईतील मुलुंड परिसरात बहरली. दोघंही सुरुवातीपासून एकमेकांना ओळखत होते
अजिंक्य आणि राधिका एकाच शाळेत शिकायचे, दोघांची घरंही जवळच होती आणि त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री झाली.
अजिंक्य व राधिका हे चांगले मित्र होते, परंतु त्यांचा स्वभाव परस्परविरोधी होती. पण, कुटुंबियांनी त्यांच्यातले प्रेम जाणले
अजिंक्य रहाणे लग्नासाठी फक्त टी-शर्ट आणि जीन्स घालून पोहोचला होता. ते त्याने स्वतः सांगितले होते.
२६ सप्टेंबर २०१४ मध्ये अजिंक्य आणि राधिकाने मराठमोळ्या पद्धतीने लग्न करून नव्या प्रवासाला सुरुवात केली.
अजिंक्य आणि राधिका यांनी लग्नात मराठमोळा पेहराव परिधान केला होता आणि त्यात दोघंही खूप सुंदर दिसत होते
अजिंक्यच्या क्रिकेट प्रवासात राधिका त्याच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. ती त्याची सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम आहे
अजिंक्य व राधिका यांना आर्या आणि राघव अशी दोन मुलं आहेत.
अजिंक्य रहाणे भारतीय संघापासून दूर आहे, परंतु तो देशांतर्गत स्पर्धांमध्ये मुंबईकडून खेळतोय..