Pranali Kodre
भारताचा असा एक माजी क्रिकेटपटू होता, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० व्या क्रमांकाचा फलंदाज म्हणजेच गोलंदाज म्हणून पदार्पण केले होते. पण नंतर तो सलामीवीर फलंदाज बनला.
हा खेळाडू म्हणजे माजी अष्टपैलू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री.
रवी शास्त्री यांनी न्यूझीलंडविरुद्ध फेब्रुवारी १९८१ मध्ये वेलिंग्टनला झालेल्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. या सामन्यात त्यांनी १० व्या क्रमांकावर फलंदाजी केली होती.
पण, नंतर त्यांनी एक ते दहा अशा सर्व क्रमांकावर फलंदाजी केली. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये सलामीला फलंदाजी करताना द्वीशतक केले होते.
शास्त्री यांनी रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी बडोदाविरुद्ध ६ चेंडूत सलग ६ षटकार मारले होते.
शास्त्री यांना १९८४ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड सिरिज स्पर्धेत मालिकावीर ठरल्याबद्दल ऑडी कारही मिळाली होती, ज्याची प्रचंड चर्चा झाली होती.
शास्त्री यांनी १९८१ ते १९९२ दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. त्यांनी ८० कसोटी सामन्यांमध्ये ११ शतकांसह ३८३० धावा केल्या, तर १५१ विकेट्स घेतल्या. त्यांनी १५० वनडेमध्ये ४ शतकांसह ३१०८ धावा केल्या आणि १२९ विकेट्स घेतल्या.
शास्त्री हे २००७ ते २०१४ दरम्यान भारतीय संघाचे संचालक होते. त्यानंतर २०१७ ते २०२१ दरम्यान ते भारताचे मुख्य प्रशिक्षक होते.
मिडिया रिपोर्ट्सनुसार भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांना १० कोटी रुपये सॅलरी बीसीसीआयकडून मिळत होती.
शास्त्री आता समालोचक म्हणून काम पाहातात. त्यामुळे त्यातूनही आता त्यांची कमाई होते. तसेच ऑडीसारख्या कंपन्यांसोबतही त्यांचे करार आहेत
मिडिया रिपोर्ट्सनुसार त्यांचा ८५ कोटी रुपये नेटवर्थ आहे.