Pranali Kodre
भारताचा स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याला राज्य शासनाकडून मुंबईतील वांद्रेमध्ये क्रिकेट अकादमीसाठी भूखंड मंजूर करण्यात आला आहे.
आधी सुनील गावस्कर यांना हा भूखंड दिलेला. पण त्यांनी त्याचा वापर केला नाही आणि तो राज्य शासनाला परत केला.
आता हा भूखंड आता अजिंक्य रहाणे याला देण्यात आला आहे. हा भूखंड २००० स्क्वेअर मीटरचा आहे.
त्या संदर्भातील शासन आदेश राज्य शासनाने दुरुस्ती आदेश जारी केले असून जमीन वाटपाचा मुळ आदेश ॲाक्टोबर २०२४ मध्ये काढण्यात आला आहे.
अद्ययावत क्रिकेट प्रशिक्षण उभारण्यासाठी भूखंड मिळावा अशी मागणी अजिंक्य रहाणेने केली होती.
भूखंड मिळाल्यानंतर रहाणेने राज्य शासनाचे आभारपण मानले होते.
दरम्यान, भूखंडासाठी ४ कोटी ८८ लाख ९४ हजार रुपये रहाणेला भरावे लागणार आहेत. त्याशिवाय भाडे ही द्यावे लागणार आहे.
रहाणेला या ठिकाणी जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी उभारायची इच्छा आहे.