Pranali Kodre
सध्या महिला ऍशेसमधील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात एकमेव कसोटी सामना ३० जानेवारीपासून मेलबर्नला खेळला जात आहे.
तसेच २९ जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या पुरुष संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉलला खेळला जात आहे.
या दोन सामन्यांमुळे एक भन्नाट योगायोग समोर आला आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात होत असलेला कसोटी सामना ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हेलीचा २८७ वा आंतरराष्ट्रीय सामना आहे.
तसेच ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या पुरुष संघात होत असलेला कसोटी सामना मिचेल स्टार्कचा २८७ वा आंतरराष्ट्रीय सामना आहे.
म्हणजेच एलिसा हेली आणि मिचेल स्टार्क एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी ऑस्ट्रेलियासाठी त्यांचा २८७ वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहेत.
विशेष गोष्ट अशी की हे दोघेही पती-पत्नी असून त्यांनी २०१६ मध्ये लग्न केले होते.
हेलीने १० कसोटी, ११५ वनडे आणि १६२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.
स्टार्कने ९५ कसोटी, १२७ वनडे आणि ६५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.