Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL) स्पर्धा २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे.
या आयपीएल हंगामापूर्वी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणे याची कर्णधारपदी निवड केली आहे.
रहाणेला आयपीएल २०२५ लिलावात पहिल्या फेरीत कोणीही खरेदी केले नव्हते, पण नंतर दुसऱ्या फेरीत त्याला १ कोटीच्या मुळ किंमतीत केकेआरने संघात घेतले होते.
आता रहाणेला कोलकाता संघाचे कर्णधारपदही मिळाले असून या हंगामात तो नेतृत्व करताना दिसेल.
अजिंक्य रहाणे आयपीएल २०२५ साठी कोलकातामध्ये ११ मार्च रोजी पोहोचला आहे.
कोलकाताला पोहल्यानंतरचे त्याचे फोटोही संघाच्या सोशल मिडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आले आहेत.
त्याच्यापाठोपाठ इतर खेळाडूही कोलकाताला पोचण्यास सुरुवात झाली आहे.
यंदा कोलकातासमोर आयपीएल विजेतेपद राखण्याचे लक्ष्य आहे. त्यांचा पहिला सामना २२ मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध रंगणार आहे.