विमानाचा ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय? छोट्याशा बॉक्समधून कशी कळते अपघाताची A टू Z माहिती..पाहा

Saisimran Ghashi

अजित पवार यांचे निधन

२८ जानेवारीला बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले असून या दुर्घटनेचा तपासही आता ब्लॅक बॉक्सच्या माहितीवर अवलंबून आहे.

ajit pawar plane crash death

|

esakal

विमानाचा 'ब्लॅक बॉक्स'

विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' हे एक अत्यंत महत्त्वाचे तांत्रिक साधन आहे जे अपघाताच्या कारणांचा उलगडा करण्यास मदत करते. 

what is plane black box

|

esakal

मूळ स्वरूप

ब्लॅक बॉक्स हे विमानाच्या उड्डाणादरम्यान सर्व तांत्रिक घडामोडींची नोंद ठेवणारे एक अतिशय मजबूत इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे.

howplane black box works

|

esakal

दोन मुख्य भाग

यामध्ये 'फ्लाइट डेटा रेकॉर्डर' (FDR) आणि 'कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर' (CVR) असे दोन भाग असतात, जे अनुक्रमे तांत्रिक डेटा आणि वैमानिकांचे संभाषण रेकॉर्ड करतात.

what are the Components of black box

|

esakal

रंगाचे वैशिष्ट्य

नाव 'ब्लॅक बॉक्स' असले तरी, शोधणे सोपे जावे यासाठी याचा रंग प्रत्यक्षात गडद नारंगी (Bright Orange) असतो.

what is the Color of black box plane

|

esakal

फ्लाइट डेटा रेकॉर्डर

हे यंत्र विमानाचा वेग, उंची, इंधनाची स्थिती आणि इंजिनची कामगिरी अशा ७०० हून अधिक तांत्रिक बाबींची सतत नोंद करते.

flight data recorder ajit pawar death information

|

esakal

कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर

हे यंत्र वैमानिकांमधील संवाद, एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेले बोलणे आणि कॉकपिटमधील महत्त्वाचे आवाज रेकॉर्ड करते.

cokpit vocie recorder(CVR)

|

esakal

अत्यंत टिकाऊ

हे उपकरण टायटॅनियम किंवा स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असते, ज्यामुळे ते भीषण स्फोट किंवा भीषण आगीतही सुरक्षित राहते.

black box durability

|

esakal

तापमान आणि दाब सहन करण्याची क्षमता

ब्लॅक बॉक्स सुमारे १,१०० अंश सेल्सिअस तापमान आणि खोल समुद्रातील प्रचंड दाब सहन करू शकतो.

plane black box Resilience

|

esakal

लोकेशन बीकन

अपघात पाण्यात झाल्यास, ब्लॅक बॉक्समधून विशिष्ट प्रकारचे अल्ट्रासोनिक सिग्नल (Pinger) बाहेर पडतात, जे ३० दिवसांपर्यंत शोध पथकाला स्थान कळवू शकतात.

plane black box ULB

|

esakal

अपघाताचा तपास

तज्ज्ञ यातील डेटाचे विश्लेषण करून विमानाचा मार्ग, तांत्रिक बिघाड किंवा वैमानिकाची चूक यापैकी नेमके कशामुळे अपघात झाला, हे शोधून काढतात.

ajit pawar death black box Investigation

|

esakal

अजित पवार यांचा अपघात

बारामती दुर्घटनेतही विमानाने धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करताना नेमके काय घडले, हे उलगडण्यासाठी तपास यंत्रणा आता ब्लॅक बॉक्समधील माहितीचा वापर होऊ शकतो.

ajit pawar plane crash black box information

|

esakal

आयुष्यभर आतड्या निरोगी ठेवायच्या आहेत ना? मग सतत 'या' 5 भाज्या खाणे ठरते फायदेशीर

येथे क्लिक करा