Aarti Badade
अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा काल साखरपुडा पार पडला. ऋतुजा पाटील यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहेत.
हा साखरपुडा पुण्याजवळील घोटावडे येथील अजित पवारांच्या फार्महाउसवर झाला. शाही विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवलेला सोहळा!
आत्या सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत जय-ऋतुजाला शुभेच्छा दिल्या आहेत.
साखरपुड्यापूर्वी जय पवार यांनी आजोबा शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या कार्यक्रमात पवार कुटुंबाचे सर्व सदस्य एकत्र जमले होते. अनेक कौटुंबिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
साखरपुडा झाल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न पडला आहे की, पवार कुटुंबात येणारी सून ऋतुजा पाटील यांची ओळख काय?
जय पवार यांची होणारी पत्नी ऋतुजा पाटील या साताऱ्यातील फलटणचे सोशल मीडिया कंपनी चालवणारे प्रविण पाटील यांच्या उच्चशिक्षित कन्या असून, जय आणि ऋतुजाची ओळख गेल्या काही वर्षांपासून आहे.