Saisimran Ghashi
शिवरायांची समाधी रायगडावर असूनही, ब्रिटिश काळात ती उपेक्षित होती. जनतेला तिचे अस्तित्वही माहीत नव्हते.
सन १८६८ मध्ये जोतीराव फुले रायगडावर गेले. तिथे त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचा प्रयत्न केला.
रायगडावर झाडझुडपात गोंधळलेल्या स्थितीत समाधी लपून गेली होती. जोतिबांनी ती शोधून स्वच्छ केली.
समाधीवर फुले वाहिल्यावर एका व्यक्तीने ती लाथेने फेकली. जोतिबांनी त्याला धारेवर धरले.
महात्मा फुल्यांनी ही उपेक्षित स्थिती 'दीनबंधू' या वृत्तपत्रातून जनतेपुढे मांडली. समाजात खळबळ उडाली.
जोतिबा फुले यांनी शिवरायांचा पोवाडा लिहून त्यांचा न्यायप्रिय, समतेचा राजा म्हणून गौरव केला.
पुण्यात चाफळकर स्वामींच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारक सभेचे आयोजन करण्यात आले. जोतिबा त्यात सहभागी झाले.
लोकमान्य टिळकांचे पट्टशिष्य केळकर यांनी ‘लोकमान्य टिळकांचे चरित्र’ मध्ये जोतिबांचे योगदान नमूद केले.
जोतिबांनी समाधीचा शोध घेऊन फक्त इतिहास नव्हे, तर शूद्रातिशूद्रांच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित केला.