औषधांची खाण आहे ओव्याचे एक पान! पोटाच्या विकारांपासून मिळेल कायमची सुटका

सकाळ डिजिटल टीम

फायदे

ओव्याची पने खाल्यास आरोग्यास कोण कोणते फायदे मिळतात जाणून घ्या.

Ajwain leaves benefits

|

sakal 

पचनासाठी उत्तम

ओव्याच्या पानांमध्ये 'थायमॉल' नावाचे घटक असते, जे पोटातील पाचक रस सक्रिय करते. यामुळे अपचन, गॅस आणि पोट फुगण्याच्या समस्यांपासून त्वरित आराम मिळण्यास मदत होते.

Ajwain leaves benefits

|

sakal 

ॲसिडिटीवर गुणकारी

जर तुम्हाला जेवणानंतर जळजळ किंवा ॲसिडिटी होत असेल, तर ओव्याचे एक पान चावून खाल्यास आराम मिळू शकतो.

Ajwain leaves benefits

|

sakal 

बद्धकोष्ठता

रोज सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पान किंवा त्याचे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास दूर होतो आणि पोट साफ राहण्यास मदत होते.

Ajwain leaves benefits

|

sakal 

सर्दी-खोकला

ओव्याच्या पानात दाहक-विरोधी (Anti-inflammatory) गुणधर्म असतात. सर्दी, खोकला किंवा घसा दुखत असल्यास ही पाने उकळून त्याचा काढा घेतल्यास फायदा होतो.

Ajwain leaves benefits

|

sakal 

नैसर्गिक डिटॉक्स

ही पाने शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा तजेलदार होते.

Ajwain leaves benefits

|

sakal 

दातांच्या आरोग्यासाठी

ओव्याच्या पानांचा वापर मुखवास (Mouth Freshener) म्हणूनही करता येतो. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि दातदुखीमध्येही आराम मिळतो.

Ajwain leaves benefits

|

sakal 

सांधेदुखीवर आराम

ओव्याच्या पानांमध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात, जे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करतात.

Ajwain leaves benefits

|

sakal 

मधुमेह नियंत्रण

काही अभ्यासांनुसार, ओव्याच्या पानांचे नियमित सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Ajwain leaves benefits

|

sakal 

लिव्हर डिटॉक्स अन् हार्ट राहणार फिट! 'हा' एक मसाला रामबाण उपाय

Black Cardamom health benefits

|

Sakal

येथे क्लिक करा