अकबराने कोणता नवीन धर्म स्थापन केला होता? त्याचं पुढे काय झालं?

संतोष कानडे

अकबर

मुघल बादशहा अकबराने १५८२ मध्ये 'दीन-ए-इलाही' नावाची आध्यात्मिक विचारप्रणाली सुरू केली.

ईश्वराचे एकत्व

या विचारप्रणालीला 'तौहीद-ए-इलाही' म्हणजेच ईश्वराचे एकत्व असेही म्हटले जाते.

'दीन-ए-इलाही

विविध धर्मांमधील चांगल्या शिकवणी एकत्र आणण्याचा अकबराचा यामागे प्रयत्न होता.

चांगल्या शिकवणी

इस्लाम, हिंदू, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मातील काही विचारांचा त्यावर प्रभाव होता.

सहिष्णुता

सर्व धर्मांचा आदर, नैतिकता, दया आणि सहिष्णुता यांना या विचारप्रणालीत महत्त्व होते.

विचारप्रणाली

अकबराने आपल्या दरबारातील निवडक व्यक्तींनाच या विचारप्रणालीचे अनुयायी म्हणून स्वीकारले.

धर्मव्यवस्था

ही सामान्य लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर सुरू केलेली धर्मव्यवस्था नव्हती, तर मर्यादित अनुयायांचा आध्यात्मिक पंथ होता.

आध्यात्मिक चळवळ

इतिहासकारांमध्ये याला स्वतंत्र धर्म म्हणावे की आध्यात्मिक चळवळ, याबाबत मतभेद आहेत.

प्रभाव

अकबराच्या मृत्यूनंतर १६०५ मध्ये या विचारप्रणालीचा प्रभाव जवळजवळ संपुष्टात आला.

मुघल

पुढील मुघल बादशहांनी ती पुढे चालवली नाही आणि कालांतराने दीन-ए-इलाही लुप्त झाले.

औरंगजेबाने महाराष्ट्रातील कोणत्या शहरांची नावं बदलली?

<strong>येथे क्लिक करा</strong>