औरंगजेबाने महाराष्ट्रातील कोणत्या शहरांची नावं बदलली?

संतोष कानडे

खडकी

आजच्या छत्रपती संभाजीनगर शहराचे मूळ नाव खडकी (खिर्की) होते.

अहमदनगर

अहमदनगरच्या निजामशाहीतील मलिक अंबर याने १६१० च्या सुमारास या शहराचा विकास केला होता.

मलिक अंबर

मलिक अंबरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा फतेहखान याने १६२६ मध्ये खडकीचे नाव फतेहनगर केले.

दख्खनचा सुभेदार

१६५३ मध्ये औरंगजेब दख्खनचा सुभेदार झाल्यानंतर त्याने फतेहनगरचे नाव औरंगाबाद ठेवले.

ऐतिहासिक नोंदी

औरंगजेबाच्या काळातील काही ऐतिहासिक नोंदींमध्ये या शहराचा उल्लेख 'खुजिस्ता बुनियाद' असाही आढळतो.

मुघल

औरंगजेबाने या शहराला दख्खनमधील मुघल सत्तेचे महत्त्वाचे केंद्र बनवले होते.

दौलताबाद

दौलताबादचे नाव औरंगजेबाने बदलले नव्हते; हे नाव दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलक याच्या काळात पडले होते.

निजामशाही

तसेच, अहमदनगरचे नाव औरंगजेबाने बदलले नव्हते. हे शहर निजामशाहीचा संस्थापक अहमद निजामशाह याच्या नावावरून ओळखले जात होते.

धाराशिव

धाराशिवचे नाव उस्मानाबाद हे हैदराबादच्या निजामाच्या काळाशी संबंधित आहे; तेही औरंगजेबाने बदलले नव्हते. मात्र हीसुद्धा नावं औरंगजेबनेच बदलली, असं बोललं जातं. त्यात तथ्य नाही.

सोन्यातही भेसळ! 'गोल्ड'मध्ये मिसळली जाणारी पावडर काय आहे?

<strong>येथे क्लिक करा</strong>