सकाळ डिजिटल टीम
अक्षय कुमार तीन दशके हिंदी चित्रपटसृष्टीत गाजवणारा सुपरस्टार आता दाक्षिणात्य चित्रपटाकडे वाटचाल करत आहे.
अक्षय कुमार तेलुगू चित्रपट 'कन्नप्पा'द्वारे साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.
'कन्नप्पा' या पौराणिक चित्रपटात अक्षय कुमार महादेवाची भूमिका साकारणार आहे.
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये त्रिशूल आणि डमरू हाती घेतलेला अक्षय कुमार महादेवाच्या पवित्र रूपात दिसत आहे.
पोस्टर शेअर करत अक्षय कुमारने लिहिले, "महादेवाच्या पवित्र जागेत पाऊल टाकताना खूप गौरव वाटतोय. ओम नमः शिवाय!"
'कन्नप्पा'मध्ये विष्णु मंचु, प्रभास, मोहनलाल, सरथकुमार, काजल अग्रवाल यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.
'कन्नप्पा' २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' चित्रपट २४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.