Anushka Tapshalkar
वैदिक पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. यंदा अक्षय्य तृतीया ३० एप्रिल रोजी साजरी केली जाईल.
या दिवशी पुण्य, समृद्धी आणि सौख्य लाभावे म्हणून ठराविक वस्तूंची खरेदी शुभ मानली जाते.
अक्षय्य तृतीयेला शांती आणि समृद्धी मिळवण्यासाठी कॉटनचे कापड खरेदी करा.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मातीचा माठ सोन्याएवढा महत्त्वाचा मानला जातो.
समृद्धी आणि सौभाग्यासाठी या दिवशी सोने-चांदी विकत घेणे अत्यंत शुभ मानले जाते.
या दिवशी सैंधव मीठ खरेदी करणे शुभ मानले जाते, कारण ते पवित्रतेचे प्रतीक आहे.
पैसा आणि संपत्ती वाढण्यासाठी लक्ष्मीच्या पूजेत पिवळ्या कवड्या अर्पण करा.
घरातील सगळ्यांच्या प्रगतीसाठी आणि यशासाठी घरात मनी प्लांट, बांबू यांसारखी लकी प्लांट लावावीत.
घरात सुख- समृद्धी नांदावी म्हणून अक्षय्य तृतीयेला पिवळी मोहरी घरी आणा.
अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिनी दान केल्याने पुण्य मिळते.
आयुष्यात यश आणि सकारात्मकता मिळवण्यासाठी "ॐ गं गणपतये नमः" या मंत्राचा जप करा.