Anushka Tapshalkar
हिंदू धर्मातील अनेक खास सणांपैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया.वैदिक पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हा सण साजरा केला जातो.
या दिवशी सोन्याची तसेच चांदीची खरेदी करणं शुभ मानलं जातं. परंतु या व्यतिरिक्त अजून काही ठराविक वस्तू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन कपडे विकत घेणे अत्यंत शुभ मानले जाते. हे कपडे पूजेच्या वेळी घातल्यास घरात सुख-समृद्धी आणि आनंद नांदतो.
या दिवशी पूजेचे साहित्य, विष्णू किंवा लक्ष्मीची मूर्ती आणल्यास पुण्य मिळते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि सौभाग्य नांदते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी झाडू घेणे शुभ मानले जाते. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि घरातील साफसफाईमुळे समृद्धी वाढते, असा विश्वास आहे.
या दिवशी मीठ विकत घेणे आणि गरजू व्यक्तींना मीठाचे दान करणे पितरांना प्रसन्न करणारे मानले जाते. त्यामुळे घरात शांतता आणि समाधान वाढते.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन भांडे विकत घेणे अत्यंत शुभ मानले जाते. नवीन भांडी घरात संपत्ती आणि लक्ष्मीचे आगमन घडवतात.