बाळकृष्ण मधाळे
सुधागड तालुक्यातील वावे गावाजवळून वाहणाऱ्या अंबा नदीच्या पात्रात एक अत्यंत दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण मासा आढळून आला आहे.
What Is an Albino Alligator Gar?
esakal
या परदेशी प्रजातीच्या माश्याचे नाव 'अल्बिनो एलीगेटर गार' असून तो चमकदार पिवळ्या आणि नारंगी रंगाचा आहे.
What Is an Albino Alligator Gar?
esakal
शुक्रवारी (ता. 10) सकाळी वावे येथील स्थानिक तरुण कैलास हिलम आणि केतन म्हसके हे नेहमीप्रमाणे नदीकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान त्यांना नदीपात्रात हा आकर्षक रंगाचा मासा मृत अवस्थेत पडलेला दिसून आला.
What Is an Albino Alligator Gar?
esakal
निसर्गातील अशा दुर्मिळ जनुकीय बदलाची (अल्बिनो अवस्था) ही रायगड जिल्ह्यातील दुसरी घटना आहे.
What Is an Albino Alligator Gar?
esakal
नुकताच माणगाव शहरात अतिवृष्टीमुळे जमिनीबाहेर पडलेला पांढऱ्याशुभ्र रंगाचा अत्यंत दुर्मिळ 'अल्बिनो चंचु वाळा' हा बिनविषारी साप आढळून आला होता.
What Is an Albino Alligator Gar?
esakal
वन्यजीव अभ्यासक सागर दहिंबेकर यांनी सांगितले की, 'गार' प्रजातीचे मासे त्यांच्या टोकदार तोंडासाठी आणि मगरीसारख्या दिसणाऱ्या जबड्यासाठी ओळखले जातात.
What Is an Albino Alligator Gar?
esakal
निसर्गामध्ये या माशांचा मूळ रंग गडद किंवा राखाडी असतो. परंतु, जनुकीय बदलांमुळे या विशिष्ट माशाचा रंग पूर्णपणे पांढरा किंवा चमकदार पिवळा-नारंगी झाला आहे.
What Is an Albino Alligator Gar?
esakal
ही प्रजाती मूळची भारतातील नसून ती उत्तर अमेरिका आणि ब्राझीलमधील नद्यांमध्ये आढळतो. हा मासा अत्यंत झपाट्याने वाढतो.
What Is an Albino Alligator Gar?
esakal
Konkan Monsoon Birds
esakal