बाळकृष्ण मधाळे
कोकणात पावसाळ्याची चाहूल लागली की संपूर्ण परिसर हिरव्यागार शालीने नटतो. डोंगर-दऱ्या धुक्याने वेढल्या जातात, ओढे-नाले खळखळू लागतात आणि या निसर्गोत्सवासोबत अनेक वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांचेही आगमन होते.
Konkan Monsoon Birds
esakal
विणीचा हंगाम आणि अन्नाच्या शोधासाठी हे पक्षी कोकणात दाखल होतात. त्यांच्या किलबिलाटाने आणि वैशिष्ट्यपूर्ण आवाजांनी पावसाळ्याची खरी सुरुवात झाल्याची जाणीव होते.
Konkan Monsoon Birds
esakal
कोकणातील प्रमुख पावसाळी पक्ष्यांमध्ये चातक, नवरंग, कस्तूर, पावशा, सुगरण, करकोचा आणि बगळा या पक्ष्यांचा विशेष उल्लेख केला जातो.
Konkan Monsoon Birds
esakal
चातक हा पावसाळ्याचा खरा दूत मानला जातो. आफ्रिकेतून मान्सूनच्या वाऱ्यांसोबत भारतात येणारा हा काळ्या-पांढऱ्या रंगाचा आणि डोक्यावर तुरा असलेला देखणा पक्षी ‘पियू... पियू...’ अशी आर्त हाक देत आकाशात भिरभिरताना दिसतो.
Konkan Monsoon Birds
esakal
नावाप्रमाणेच नऊ आकर्षक रंगांनी नटलेला नवरंग पक्षी उन्हाळ्याच्या अखेरीस आणि पावसाळ्याच्या प्रारंभी कोकणात येतो. अत्यंत लाजाळू स्वभावाचा हा पक्षी दाट झुडपांमध्ये लपून राहतो. जमिनीवरील सुकलेल्या पानांखाली दडलेले किडे, अळ्या आणि गांडुळे शोधून खाणे हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
Konkan Monsoon Birds
esakal
स्थानिक भाषेत “शिट्या चोर” किंवा “आनंदी पक्षी” म्हणून ओळखला जाणारा कस्तूर गडद निळसर-काळ्या रंगाचा असतो. पावसाळ्यात त्याचा उत्साह विशेष खुलून दिसतो. मानवी शिटीसारखा मधुर आवाज काढण्याच्या त्याच्या कौशल्यामुळे तो पक्षीप्रेमींमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
Konkan Monsoon Birds
esakal
पावसाळ्याच्या आगमनापूर्वी “पेरते व्हा... पेरते व्हा...” असा भासणारा त्याचा विशिष्ट आवाज सतत कानावर पडतो. हा आवाज शेतकऱ्यांसाठी शेतीच्या कामांची सुरुवात करण्याचा नैसर्गिक इशारा मानला जातो. विशेष म्हणजे, पावशा स्वतः घरटे बांधत नाही, तर इतर पक्ष्यांच्या घरट्यांमध्ये आपली अंडी ठेवण्याची अनोखी सवय त्याची आहे.
Konkan Monsoon Birds
esakal
उघड्या चोचीचा करकोचा, बगळा आणि ढोक (हेरॉन) हे पक्षी कोकणातील शेती व्यवस्थेचे महत्त्वाचे साथीदार आहेत. पावसाळ्यात शेतामधून बाहेर येणारे किडे, अळ्या आणि इतर लहान जीव खाऊन ते नैसर्गिक कीड नियंत्रणाचे काम करतात. त्यामुळे शेतकऱ्यांशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले आहे.
Konkan Monsoon Birds
esakal
कोकणातील हे पावसाळी पक्षी केवळ पर्यावरणाची शोभा वाढवत नाहीत, तर परिसंस्थेचा समतोल राखण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या अधिवासाचे संरक्षण, जंगलांचे संवर्धन आणि जलस्रोतांची स्वच्छता राखणे ही काळाची गरज आहे.
Konkan Monsoon Birds
esakal
Monsoon Tourism India
esakal