बाळकृष्ण मधाळे
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात नुकताच अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा अल्बिनो 'चंचु वाळा' आढळून आला.
Rare Albino Snake Found in Raigad
esakal
माणगाव परिसरातील शेती आणि ओलसर जमिनीवर हा साप आढळून आला.
Rare Albino Snake Found in Raigad
esakal
स्थानिक नागरिक योगेश तुपट यांनी या सापाचे अनोखे रूप पाहून वन्यजीव अभ्यासकांशी संपर्क साधला.
Rare Albino Snake Found in Raigad
esakal
माणगावमधील प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी या सापाची पाहणी केली आणि तो 'अल्बिनो चंचु वाळा' असल्याची माहिती दिली.
Rare Albino Snake Found in Raigad
esakal
'चंचु वाळा' (शास्त्रीय नाव: Grypotyphlops Acutus) हा सापाचा एक बिनविषारी प्रकार आहे.
Rare Albino Snake Found in Raigad
esakal
हे साप प्रामुख्याने जमिनीखाली, मातीत किंवा कुजलेल्या पानांच्या ढिगाऱ्याखाली राहतात. त्यांचं मुख्य अन्न वाळवी आणि मुंग्यांची अंडी आहेत.
Rare Albino Snake Found in Raigad
esakal
ते आकाराने लहान असतात आणि त्यांचे डोळे आणि तोंड पाहताना चोचीसारखा आकार दिसतो, म्हणून त्यांना 'चंचु वाळा' म्हणतात.
Rare Albino Snake Found in Raigad
esakal
'अल्बिनो' ही एक दुर्मिळ जनुकीय अवस्था आहे, ज्यामध्ये सापाच्या शरीरातील रंगद्रव्ये पूर्णपणे नष्ट होतात. यामुळे सामान्यतः गडद रंगाचा असलेला हा साप पांढरा किंवा फिकट गुलाबी रंगाचा दिसतो.
Rare Albino Snake Found in Raigad
esakal
ही अवस्था निसर्गात खूप दुर्मिळ असते आणि असे प्राणी सहसा निसर्गात तग धरून राहणे आणि जगणे अवघड असते, असे वन्यजीव अभ्यास कुवेसकर यांनी सांगितले.
Rare Albino Snake Found in Raigad
esakal
What Is an Albino Alligator Gar?
esakal