संतोष कानडे
दारु पिण्याविषयी अनेक समज गैरसमज आहेत. दारु प्यावी की नाही? असा प्रश्न अनेकांना कायम सतावत असतो.
दारुविषयी आयुर्वेदामध्ये नेमकं काय म्हटलंय, याविषयी आयुर्वेदाचार्य डॉ. मानसी मेहेंदळे धामणकर यांनी एका मुलाखतीत माहिती दिली.
डॉ. मेहेंदळे म्हणतात, मदिरा फर्मेंटेड असते त्यामुळे नशा येते. लोक म्हणतात आम्ही टेन्शन आल्यानंतर दारु पितो.
आयुर्वेदानुसार, औषध म्हणून कधी कधी मद्यपान करावं, तेही ऋतुनुसार सोमरस प्राशन करावं.
डॉ. मेहेंदळे पुढे सांगतात, अनेस्थिशिया नव्हता तेव्हा रुग्णाला मदिरा देऊन, त्याला बेशुद्ध करुन सर्जरी केली जात असे. असे ग्रंथांमध्ये उल्लेख आहेत.
मानसाने कोणतीही गोष्ट प्रमाणात करायला हवी. परंतु नेहमी दारु पित असाल तर चुकीचं आहे, असं डॉक्टर पुढे सांगतात.
योग्य प्रमाण, योग्य ऋतू आणि डॉक्टरांची परवानगी असेल तर चालेल. कारण विषसुद्धा योग्य प्रमाणात शरीरात गेलं असेल तर त्याचा त्रास होत नाही.
परंतु आयुष्यामध्ये दारुची गरज नाही, ती नाही घेतली तरी चालेल.. असं डॉक्टर मेहेंदळे सांगतात.
एकंदरीच स्वतःवरचा कंट्रोल आणि शक्य तितक्या वेळा मद्यपान टाळणं गरजेचं आहे.