सकाळ वृत्तसेवा
मुळात दारु पिणं शरीरासाठी चांगलं नाहीच. तरीही काही अभ्यासानुसार, विशिष्ट प्रमाणात दारु घेतली तर नुकसान होत नाही.
खूप जास्त दारु घेतली तर शरीरावर विपरित परिणाम होतात. कारण त्यात खूप जास्त प्रमाणात कॅलरीज असतात पण न्यूट्रिशन नसतात.
जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे जनरल मेडिसीन कन्सल्टंट डॉ. रोहन सेकीरा यांनी मागे याबाबत माहिती दिली होती.
ते म्हणतात, एक स्टँडर्ड ड्रिंक साईज ३३० एमएल बिअर आणि ३० मिली हार्ड अल्कोहोल, तसेच १५० मिली वाईन असं असंत.
शरीरामध्ये अल्कोहोल डायजेस्ट करण्यासाठी एक इन्झाईम असतं. ज्याला अल्कोहल हायड्रोजन नेट म्हटलं जातं.
ज्याच्या लिव्हरमध्ये याची मात्र बरोबर असते त्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही. परंतु ज्याच्या शरीरात ही मात्र कमी असते त्याला लिव्हरशी संबंधित आजार होतात.
आपलं शरीर एका तासात केवळ एक ड्रिंक आणि दिवसात केवळ तीन ड्रिंक पचवू शकतं. परंतु एकपेक्षा अधिक स्टँडर्ड ड्रिंक घेणं घातक आहे.
डॉ. रोहन सांगतात, दारु पिण्याचे काही फायदे आहेत. परंतु मी याचं समर्थन करणार नाही.
तरीही रेड वाईनची विशिष्ट मात्रा घेतली तर वेट लॉस आणि स्किनशी संबंधित काही फायदे होऊ शकतात.
दारुच्या अधिक सेवनाने तोंड, गळा, अन्ननलिका आणि लिव्हरसह इतरही कॅन्सर होऊ शकतात.