Pranali Kodre
७ जून ही तारीख अलेक्झांडर झ्वेरेव म्हणजेच 'साशा' त्याच्या आयुष्यात कधीही विसरणार नाही!
Alexander Zverev Wins French Open 2026
Sakal
बरोबर ४ वर्षांपूर्वी जून २०२२ मध्ये याच क्ले-कोर्टवर राफेल नदालविरुद्ध खेळताना त्याच्या पायाचे लिगामेंट्स फाटले होते, २ हाडे फ्रॅक्चर झाली आणि त्याला व्हीलचेअरवरून कोर्टबाहेर जावे लागलं होतं.
Alexander Zverev Wins French Open 2026
Sakal
अनेक महिने टेनिसपासून दूर राहिलेल्या साशाला याआधी तीन वेळा ग्रँड स्लॅमच्या फायनलमध्ये अपयशाचा सामना करावा लागला.
Alexander Zverev Wins French Open 2026
Sakal
पण अखेर ७ जून २०२६ रोजी चौथ्या प्रयत्नात, ४ तास १६ मिनिटांच्या महामुकाबल्यात इटलीच्या कोबोलीला नमवून त्याने अखेर फ्रेंच ओपनवर आपले नाव कोरले.
Alexander Zverev Wins French Open 2026
Sakal
साशाचा हा विजय फक्त कोर्टवरील आव्हानांवर नाही, तर त्याच्या आयुष्यातील संघर्षावर मात करणारा आहे.
Alexander Zverev Wins French Open 2026
Sakal
घरात वडील आणि १० वर्षांनी मोठा असलेला भाऊ मिशा हे टेनिस खेळाडू, त्यामुळे त्याला टेनिसचं बाळकडून घरातूनच मिळालं खरं, मात्र वयाच्या तिसऱ्याच वर्षी त्याला टाईप वनचा डायबेटिज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
Alexander Zverev Wins French Open 2026
Sakal
डायबेटिजह टेनिससारखा खेळ खेळणं धोक्याचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, पण साशासाठी त्याचं कुटुंब त्याची ताकद बनलं.
Alexander Zverev Wins French Open 2026
Sakal
त्याला सामन्याआधी, सामन्यावेळी त्याची ब्लडशुगर चेक करावी लागते. त्यासाठी काही नियमही बदलावे लागले. अनेकदा साशा सामना सुरू असतानाच इन्शुलिन घेताना दिसतो.
Alexander Zverev Wins French Open 2026
Sakal
हे सर्व असतानाच टेनिसबाहेर त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्सने त्याच्यावर केलेल्या आरोपांमुळेही सातत्याने त्याच्यावर टिका झाली आहे.
Alexander Zverev Wins French Open 2026
Sakal
एकीकडे कोर्टबाहेर आरोपांचे वादळ आणि दुसरीकडे डायबेटिजसोबतची लढाई सुरू असतानाच साशानं फ्रेंच ओपन जिंकलं.
Alexander Zverev Wins French Open 2026
Sakal
तो म्हणाला, आता यापुढे काहीही होवो, मी कायम ग्रँड स्लॅम चॅम्पियन म्हणूनच ओळखला जाईन आणि हे पदक माझ्याकडून आता कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
Alexander Zverev Wins French Open 2026
Sakal
Rafael Nadal
Sakal