Mayur Ratnaparkhe
'मेटा'चे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी २८ वर्षीय अब्जाधीश अलेक्झांडर वांग यांची कंपनीचे नवीन एआय प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीअंतर्गत मेटाने त्यांच्या स्टार्टअपमध्ये अंदाजे १.१६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
वांग आता मेटाच्या सर्वात मोठ्या एआय प्रोजेक्ट सुपरइंटेलिजेंस लॅब्सचे नेतृत्व करतील.
अलेक्झांडर वांग हे न्यू मेक्सिकोचे रहिवासी आहेत.
अलेक्झांडर वांग कंपनीच्या एआय संशोधन आणि विकासाला गती देण्यासाठी मेटाने त्यांना नियुक्त केले आहे.
अलेक्झांडर वांग यांनी २०१६ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी त्यांचे स्टार्टअप, स्केल एआय लाँच केले होते.
त्यावेळी त्यांनी आणि त्यांची पार्टनर लुसी गुओ यांनी सिलिकॉन व्हॅलीमध्ये एका स्टार्टअप अॅक्सिलरेटर प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला.
वागं यांनी त्यांचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी कॉलेजही सोडले होते.
आज स्केल एआय जगातील आघाडीच्या डेटा लेबलिंग आणि एआय प्रशिक्षण प्लॅटफॉर्मपैकी एक आहे, ज्याचे मूल्यांकन १४ अब्ज डॉलर आहे.
esakal