Monika Shinde
दिवाळीनंतर नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ पर्यंत महाराष्ट्रात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत.
या निवडणुका दोन टप्प्यांत होणार असून, मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासणार आहे. त्यामुळे शिक्षकांची मदत आवश्यक आहे.
राज्यभरातील शिक्षकांना या निवडणुकीत विविध कामे करण्यासाठी ड्युटीवर नेमण्यात येणार आहे, जसे की मतदार नोंदणी आणि मतदान व्यवस्थापन.
शिक्षक निवडणूक ड्युटीमध्ये मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी मदत करतात.
शिक्षकांचे काम निवडणूक अधिक पारदर्शक, निर्भीड आणि यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते.
शिक्षक संघटनांकडून निवडणूक ड्युटीबाबत काही प्रश्न उपस्थित केले जात असले तरी नियमांनुसार ही जबाबदारी असते.
शिक्षकांनीही याला सकारात्मक दृष्टीने पाहून देशातील लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे.