संतोष कानडे
इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांची २८ फेब्रुवारी रोजी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हत्या झाली. सध्या त्यांच्या बोटात अंगठ्यांची जगभरात चर्चा आहे.
ते वेगवेगळ्या रंगांच्या खड्यांची अंगठी घालायचे. खामेनेईंच्या अंगठीत सहसा 'अकीक' हा दगड असायचा. शिया इस्लाममध्ये अकीकची अंगठी घालणे अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते.
खामेनेई वापरत असलेला अकीक हा दगड प्रामुख्याने यमेन मधून आणलेला असायचा. यमेनचा अकीक जगात सर्वोत्तम मानला जातो.
या अंगठीच्या माध्यमातून ते यमेन आणि तिथल्या शिया समुदायाशी असलेले आपले भावनिक आणि राजकीय नाते अधोरेखित करत असायचे.
जेव्हा इराण आणि इस्रायल किंवा अमेरिका यांच्यात तणाव वाढायचा, तेव्हा खामेनेईंच्या अंगठीच्या रंगाकडे जगाचं लक्ष असायचं.
जेव्हा ते गडद लाल रंगाची अंगठी घालतात, तेव्हा तो 'संघर्ष' किंवा 'बदल्याचा' संकेत मानला जायचा.
इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यापूर्वी त्यांनी लाल रंगाची अंगठी घातलेले फोटो व्हायरल झाले होते. कधी ते काळ्या रंगाची अंगठीही घालायचे.
खामेनेईंच्या काही अंगठ्यांवर कुराणमधील आयती किंवा 'या हुसेन', 'या अली' सारखी धार्मिक घोषवाक्ये कोरलेली असत.
खामेनेई अनेकदा आपल्या जवळच्या विश्वासू कमांडर्सना किंवा शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना स्वतःच्या हातातील अंगठी भेट म्हणून द्यायचे.
इराणमध्ये सर्वोच्च नेत्याकडून अंगठी मिळणे हा सर्वात मोठा सन्मान मानला जायचा.
कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हातातील अंगठीवरूनच त्यांची ओळख पटली होती, जी त्यांना खामेनेईंनी यांनी दिलेली होती.