संतोष कानडे
मृत्यू झाल्यानंतर आत्म्याची पहिली रात्र कशी असते, त्याच्या भावना काय असतात, याबाबत गरुड पुराणामध्ये लिहिलेलं आहे.
मृत्यूनंतरची पहिली रात्र अत्यंत वेदनादायी असते, एखादा व्यक्ती शेवटचा श्वास घेतो त्यानंतर त्याचा आत्मा बाजूलाच उभा असतो.
बाजूला पडलेल्या शरीराकडे आत्मा बघत असतो, असं गरुड पुराणामध्ये म्हटलेलं आहे. तो आपल्या नातेवाईकांकडेही बघत असतो.
नातेवाईक ओक्साबोक्क्षी रडत असतात, पाय धरतात, चुंबन घेतात.. हे सगळं आत्मा बाजूला उभा बघत असतो.
गरुड पुराणात पुढे सांगितलय की, हे सगळं दुःख आत्मा बघत असतो पण नातेवाईकांना थांबवू शकत नाही.
पहिल्याच रात्री आत्म्याला कळते की तो त्या जगाचा नाही. तो आपल्या प्रियजनांना शोधत फिरत असतो. परंतु त्याचा आवाज कुणालाही येत नाही.
पहिली रात्र आत्म्यासाठीही फार कठीण असते. शरीर, नातेसंबंध सर्वकाही मागे राहिल्याची जाणीव आत्म्याला हळूहळू होत असते.
त्यामुळेच गरुड पुराणामध्ये प्रियजनांवर प्रेम करायचं सांगितलं आहे. आयुष्य असेपर्यंत जवळच्या लोकांना अंतर देऊ नये.