Anuradha Vipat
आलिया भटने एक लांबलचक पोस्ट लिहून तिच्या मनातील राग व्यक्त केला
तिच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून तिला बरंच काही बोललं जात असल्याने आलियाने अखेर संतापाने सर्वांनाच सुनावलं आहे.
आलियाला सर्जरी आणि बोटॉक्सवरून ट्रोल करण्यात आलं आहे.
आलियाने बोटॉक्स केले आहे. पण तिची ट्रीटमेंट चुकीचे झाल्याने चेहरा बिघडला असल्याचं काहींनी म्हटलं आहे
पोस्ट करत आलियाने लिहिलंय की, अतिशय दुःखाची बाब म्हणजे महिलेसाठी एका महिलेकडूनच या सर्व गोष्टी म्हटल्या जात आहेत
पुढे आलियाने लिहिलंय की, ‘जगा आणि जगू द्या’ या धोरणाचे काय झालं? कोणाला स्वतःच्या हिशेबाने जगण्याचा हक्क नाहीय का?
आपल्याला एकमेकांचा अपमान करण्याची इतकी सवय लागली आहे की या सर्व गोष्टी अगदी सामान्य वाटतात. अशी लांब-लचक पोस्ट करत आलियाने संताप व्यक्त केला होता.