सूरज यादव
अॅलिस हुआंग ही एनव्हिडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांच्याशी कथित संबंधांमुळे चर्चेत आली आहे. दोघांचे आडनाव समान असले तरी त्यांच्यात कौटुंबिक नाते नाही.
alice huang
Esakal
जेन्सेन हुआंग यांनी ८ नोव्हेंबरला कर्मचाऱ्यांना संदेश पाठवला. त्यात त्यांनी पत्नीची फसवणूक केल्याची कबुली दिली आणि कुटुंबाची माफी मागितली.
alice huang
Esakal
अॅलिस हुआंगला हुआंग ले या नावानेही ओळखले जाते. तिने यापूर्वी बँकिंग आणि गुंतवणूक क्षेत्रात काम केले आहे.
alice huang
Esakal
अॅलिस २०२३ मध्ये सिंगापूरमधील मेगास्पीड इंटरनॅशनल कंपनीची संचालक आणि प्रमुख भागधारक झाली होती. ही कंपनी एनव्हिडियाची क्लाउड पार्टनर होती.
alice huang
Esakal
अॅलिसने २०२३ मध्येच मेगास्पीडमधील संचालकपद सोडले. तिचे समभागही दुसऱ्या कंपनीकडे हस्तांतरित झाले. मात्र त्यानंतरही ती कंपनीच्या कामकाजात सहभागी होती का याबाबत वेगवेगळे दावे आहेत.
alice huang
Esakal
अमेरिकेतील काही यंत्रणांनी अॅलिस चीनसाठी गुप्त माहिती गोळा करत असल्याचा संशय व्यक्त केल्याचे वृत्त आहे. चीनने हे आरोप फेटाळले आहेत.
alice huang
Esakal
सिंगापूरच्या गृह मंत्रालयाने अॅलिस हुआंगच्या कथित गुप्तहेर संबंधांची चौकशी केल्याचा दावा फेटाळला आहे. मात्र मेगास्पीड कंपनीबाबतची चौकशी सुरू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
alice huang
Esakal
अॅलिस हुआंग सध्या कुठे आहे याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. रॉयटर्सला तिचे ठिकाण शोधता आलेले नाही. जेन्सेन हुआंग यांच्या कबुलीनंतरही अॅलिसने सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.
alice huang
Esakal
Jacobin Cuckoo
Esakal