kimaya narayan
अभिनेत्री अलका कुबल या मराठी इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अभिनेत्री. अलका यांनी आजवर अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं.
ज्या सिनेमाने अलका यांना सुपरस्टार बनवलं तो सिनेमा म्हणजे माहेरची साडी. पण तुम्हाला माहितीये अलका या सिनेमासाठी पहिली निवड नव्हत्या.
या सिनेमासाठी निर्माते विजय कोंडके यांनी आधी भाग्यश्रीची निवड लक्ष्मीच्या भूमिकेसाठी केली होती. त्यासाठी ते सहा महिने भाग्यश्री यांच्या वडिलांशी ते सहा महिने मिटिंग करत होते.
त्याचदरम्यान भाग्यश्रीचा मैने प्यार किया सिनेमा सुपरहिट झाला. त्यामुळे तिने या सिनेमाला नकार दिला. त्यानंतर विजय यांनी अलका यांना या सिनेमासाठी विचारलं.
अलका यांनी या सिनेमासाठी मानधनामुळे नकार दिला होता पण नंतर त्या तयार झाला. हा सिनेमा सुपरहिट झाला.
या सिनेमामुळे अलका यांना मराठी इंडस्ट्रीतील महिला सुपरस्टार बनवलं. त्यांचं मानधन पुरुष कलाकारांपेक्षा जास्त होतं.
सध्या अलका वजनदार या नाटकात काम करत आहेत.