आशुतोष मसगौंडे
अल्लू अर्जुनच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या सर्वोत्कृष्ठ चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत.
2004 मध्ये रिलीज झालेला आर्या हा अल्लू अर्जुनच्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटाचे दिग्दर्शनही पुष्पाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी केले होते.
अल्लू अर्जुनचा 'वेदम' 2010 मध्ये रिलीज झाला होता. अर्जुनसोबत अनुष्का शेट्टीही दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला.
सुरेंद्र रेड्डी दिग्दर्शित या चित्रपटात श्रुती हासन, रवी किशन, प्रकाश राज, ब्रह्मानंदम आणि राम प्रकाश यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सरेननोडू चित्रपटात एका माजी सैनिकाची गोष्ट सांगितली आहे. जो कायद्याने शिक्षा न होणाऱ्या भ्रष्ट लोकांना शिक्षा देत असतो. या चित्रपटात रकुल प्रीत सिंग, आधी पिनिसेट्टी, कॅथरीना ट्रेसा, श्रीकांत आणि सुरेखा वाणी यांच्या भूमिका आहेत.
2021 मध्ये आलेल्या याचित्रपटाने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. याचित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 375 कोटींची कमाई केली होती. यामध्ये अल्लू अर्जूनसह रश्मीका मंदाना झळकली होती.
ॲक्शन चित्रपट 'डीजे' अल्लू अर्जुनच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदीतही डब करण्यात आला आहे. अल्लू अर्जुनशिवाय पूजा हेगडे आणि राव रमेश या कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे.
तेलुगु चित्रपटातील सर्वाधिक वेळा पाहिल्या गेलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. हा अल्लूच्या यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी त्रिविक्रम श्रीनिवाससोबत काम केले आहे.