Monika Shinde
एलोवेरा जेल ही सगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी चांगली असते.
तुम्ही जर रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावलंत, तर त्वचा मऊ, स्वच्छ आणि तजेलदार होते.
चला जाणून घेऊया रात्री एलोवेरा जेल लावून झोपल्याचे काय फायदे होतात.
रात्री झोपताना कोरफडीचे जेल लावल्यास दिवसभरातील उन्हाचा व उष्णतेचा परिणाम कमी होतो. हे त्वचेवर थंडावा देऊन आराम देते.
कोरफडीमध्ये दाहशामक गुणधर्म असल्यामुळे त्वचेवरील खाज, लालसरपणा किंवा सूज कमी होते. संवेदनशील त्वचेसाठी हे फार उपयोगी आहे.
कोरफड अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी भरलेली असते. त्यामुळे चेहऱ्यावरच्या बॅक्टेरिया कमी होऊन पिंपल्स कमी होण्यास मदत होते.
रात्री कोरफडीचे जेल लावल्याने त्वचा कोरडी राहत नाही. त्यातील नैसर्गिक मॉइश्चर त्वचेला हायड्रेट ठेवतो.
कोरफडीचे नियमित वापराने सुरकुत्या, काळे डाग, टॅनिंग आणि त्वचेवरील अनियमित रंग कमी होतो.