Aarti Badade
प्रथिनांची कमतरता झाल्यास शरीर कमकुवत होते.केस गळणे, जखमा लवकर न भरणे, अशक्तपणा, सूज येणे इ. त्रास होतात.वारंवार आजारी पडण्याचा धोका वाढतो.त्यामुळे शरीरात प्रथिनांची कमतरता होऊ देऊ नका.
अंडी हे पूर्ण प्रथिने असलेले अन्न आहे.सहज पचणारे आणि सर्व आवश्यक अमीनो आम्लांनी समृद्ध.नाश्त्यासाठी उत्तम पर्याय.
१७४ ग्रॅम शिजवलेल्या चिकन ब्रेस्टमध्ये सुमारे ५६ ग्रॅम प्रथिने.१०० ग्रॅममध्ये ३२ ग्रॅम प्रथिने.वजन कमी करत असाल तरी उपयुक्त.
बदाम, अक्रोड, तीळ, चिया, अळशी बिया यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात.आरोग्यासाठी फायदेशीर आणि सहज खाता येण्यासारखे.
चीज व सोयाबीनमध्ये भरपूर प्रथिने.शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांची चांगली पर्याय.
संपूर्ण धान्य, डाळी, चणे, राजमा हेही प्रथिनांचे चांगले स्रोत.दुग्धजन्य पदार्थांमधूनही प्रथिनांची पूर्तता होते.
वरील सर्व माहिती ही सर्वसामान्य आरोग्यदृष्टीने सांगितलेली आहे. कोणताही आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.