Anushka Tapshalkar
योगा मुळातच तुमचा थकवा आणि आळस दूर करून तुमचं शरीर सुदृढ करतो. त्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजतवानं आणि प्रसन्न वाटतं.
या आसनामुळे संपूर्ण शरीराला ताण दिला जातो. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि गुरुत्वाकर्षणाच्या नियमित प्रवाहाच्या उलट्या दिशेने प्रवाह झाल्याने शरीरात जास्त ऊर्जा निर्माण होते.
या आसनामुळे तुमचं शरीर आणि मन शांत राहते आणि काही ताण असेल तर तो देखील कमी होतो. यामुळे तुमचा थकवा कमी होतो आणि तुम्हाला प्रसन्न वाटते.
सूर्यनमस्काराची सहावी स्थिती म्हणजे भुजंगासन. या आसनामुळे छाती पूर्ण आणि व्यवस्थित उघडते, शरीरात उत्साह वाढतो आणि मणक्याची लवचिकता वाढते.
हे आसन करताना तुम्हाला कुंबरेतून पुढच्या दिशेने, शरीराला पूर्ण ताण देऊन वाकावे लागते, त्यामुळे मांड्याना ताण बसतो. ज्यामुळे थकवा दूर होतो आणि पायही लवचिक बनतात.
नियमित ३० ते ६० सेकंड प्लॅन्क केल्याने उर्जेची पातळी वाढते आणि सुस्ती दूर होण्यास मदत होते.
पाठीवर झोपून, पाय गुडघ्यात दुमडून, कंबर वर उचलून सेतूबंधासन केले जाते.
विपरीत करणि आसन थकवा आणि तणाव कमी करते आणि रक्तप्रवाह सुधारते. हे पाय आणि पाठीचा कणा आरामशीर ठेवते तसेच मन शांत करून चांगली झोप लागायला मदत करते.
शवासन हे करायला सोपे आणि शरीरासाठी एक आरामदायक आसन आहे. यामुळे शरीर आणि मन पूर्णपणे रिलॅक्स होते आणि नवीन उर्जा मिळते.