Anushka Tapshalkar
"ताड" म्हणजे ताडाच्या झाडासारखं उभं राहणं, त्यामुळे या आसनामध्ये शारीरिक स्थिती ताडाच्या झाडासारखी उंच आणि स्थिर असते. म्हणून याला ताडासन म्हणतात. या आसनाचे अनेक फायदे आहेत.
ताडासन केल्याने मणक्यांची लांबी वाढते आणि शरीराची योग्य ठेवण सुधारते. हे आसन नियमित केल्यास पाठदुखी आणि कुबड येण्याचा त्रास कमी होतो.
या आसनामुळे पायांचे स्नायू मजबूत होतात आणि गुडघे व घोटे सक्रिय होतात. ताडासन नियमित केल्यास शरीराचा समतोल वाढतो आणि संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो.
हे आसन श्वसन प्रणाली सुधारते आणि फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेत वाढ करते, विशेषतः ज्यांना श्वासोच्छवासाच्या समस्या असतात त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
ताडासनामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे स्नायूंना अधिक ऑक्सिजन मिळतो आणि थकवा कमी होतो. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि शरीराला ताजेतवाने वाटते.
हे आसन केल्याने शरीर जास्त वेळ उभे राहण्यास सक्षम होते आणि संपूर्ण शरीराच्या सहनशक्तीत वाढ होते.
ताडासनामुळे शरीराची स्थिरता आणि संतुलन वाढते. घोटे, तळपाय आणि कोअर स्नायू सक्रिय होऊन शरीर मजबूत होते.
ताडासन केल्याने मानसिक स्थैर्य मिळते, ज्यामुळे चिंता आणि स्ट्रेस दूर होतो. हे आसन केल्यानंतर मन हलके वाटते आणि शरीराला ताजेतवाने वाटते.
ताडासनामुळे शरीराची ठेवण सुधारते, ज्यामुळे पचनसंस्था कार्यक्षम होते. यामुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो, आणि शरीर निरोगी राहते.