जिथं हत्तीही होते शिल्पकार...८०० वर्ष जुनं लासूरचं रॉक-कट आनंदेश्वर मंदिर एकदा बघाच!

Shubham Banubakode

लासूर गावातील अनोखे मंदिर

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील लासूर गावात पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आनंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील एक आश्चर्यकारक रॉक-कट मंदिर आहे.

Lasur Anandeshwar Temple | esakal

कुणी बांधलं?

काळ्या दगडात बांधलेले हे मंदिर दुरून किल्ल्यासारखे दिसते. १३व्या शतकात देवगिरीच्या यादवांचे राजा रामचंद्र यांनी बांधले असल्याचे ऐतिहासिक नोंद आहे.

Lasur Anandeshwar Temple | esakal

वास्तुशिल्पाची वैशिष्ट्ये

हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधले असले तरी त्याची रचना अतिशय असामान्य आहे. मंदिराचा नकाशा तीन पाकळ्यांच्या फुलासारखा आहे, ज्याच्या चौथ्या बाजूला छोटे प्रवेशद्वार आहे.

Lasur Anandeshwar Temple | esakal

कसं आहे मंदिर?

मंदिरात तीन गर्भगृह आणि मध्यभागी खुल्या स्वर्ग मंडपाची रचना आहे, जी निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर खांबांवरील कोरीव कामासह दृश्यरम्य आहे.

Lasur Anandeshwar Temple | esakal

काळ्या दगडाचे रहस्य

मंदिराच्या बांधकामासाठी वापरलेला काळा दगड स्थानिक परिसरात उपलब्ध नाही, यामुळे त्याच्या निर्मिती आणि वाहतुकीबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात.

Lasur Anandeshwar Temple | esakal

शिव मंदिर आणि कोरीव काम

मुख्य गर्भगृहात शिवलिंग आहे, जे बारा खांबांनी आधारित आहे. मंदिराच्या छतावर यक्षांच्या विविध रूपांचे कोरीव काम दिसते.

Lasur Anandeshwar Temple | esakal

विलक्षण डिझाईन्स

मंदिरात फुलांचे, भूमितीय, मंडल आणि इतर अनेक नमुने कोरलेले आहेत, जे इतर समकालीन मंदिरांमध्ये दुर्मीळ आहेत.

Lasur Anandeshwar Temple | esakal

पुरातत्त्वीय शोध आणि हत्तींचा सहभाग

मंदिराच्या आसपासच्या उत्खननात काळ्या दगडातील मूर्ती आणि शिल्पे सापडली आहेत. दगडांवरील कोरीव कामासाठी हत्तींचा वापर झाल्याचे काही पुरावे आहेत.

Lasur Anandeshwar Temple | esakal

संरक्षण

आनंदेश्वर मंदिर हे आता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) च्या संरक्षणाखाली संरक्षित स्मारक आहे. अनोखे बांधकाम, शिल्पकला आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे हे मंदिर एक आकर्षण आहे.

Lasur Anandeshwar Temple | esakal

महाराष्ट्रातली ८०० वर्ष जूनी विहीर आजही आहे शाबूत...उतरायला आहेत ८५ पायऱ्या

Mahimapur Stepwell 800 Years Old | esakal
हेही वाचा -