महाराष्ट्रातली ८०० वर्ष जूनी विहीर आजही आहे शाबूत...उतरायला आहे ८५ पायऱ्या

Shubham Banubakode

सातमजली पायविहीर

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात वसलेल्या महिमापूर गावातील सातमजली पायविहीर ही ८०० वर्षे जुनी स्थापत्यकलेतील अप्रतिम वास्तू आहे.

Mahimapur Stepwell 800 Years Old | esakal

वास्तूचे वैशिष्ट्य आणि रचना

चौकोनी आकाराची ही विहीर ८० फूट खोल, ४० मीटर रुंद आणि २५ मीटर लांब आहे. ८५ पायऱ्यांद्वारे तळापर्यंत जाता येते. कमानी, कोरीव पुष्पे, आणि ओट्यासमान रचना यांनी सजलेली ही विहीर राजवाड्यासारखी भासते.

Mahimapur Stepwell 800 Years Old | esakal

गूढ आणि दंतकथा

विहिरीच्या निर्मितीचा इतिहास अज्ञात आहे. गावकरी सांगतात की, विहीर आधी बांधली गेली आणि नंतर गाव वसले. खजिना दडल्याच्या दंतकथा प्रचलित असून, कपारीसमान रचना अद्याप गूढच आहे.

Mahimapur Stepwell 800 Years Old | esakal

मुघलकालीन स्थापत्यशैली

अभ्यासकांच्या मते, ही मुघलकालीन विहीर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि वाटसरूंना पाणी व निवारा देण्यासाठी बांधली गेली. १२ दरवाजे आणि कोरीव काम यामुळे ती स्थापत्यशैलीचा अजोड नमुना आहे.

Mahimapur Stepwell 800 Years Old | esakal

संरक्षणासाठी बांधकाम?

तेराव्या-चौदाव्या शतकातील युद्धकालीन परिस्थितीत संरक्षणासाठी ही विहीर बांधली असावी, असा अंदाज आहे. वरचे दोन मजले कोसळल्याने आतील बांधकाम उघडे पडले आहे, परंतु ८०० वर्षांनंतरही ते शाबूत आहे.

Mahimapur Stepwell 800 Years Old | esakal

दुर्लक्षित ऐतिहासिक स्मारक

नागपूरच्या पुरातत्व विभागाने ही विहीर राज्य संरक्षित स्मारक म्हणून नोंदवली आहे, परंतु संवर्धनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. पर्यटनस्थळ म्हणूनही याकडे लक्ष दिले गेले नाही, आणि इतिहास सांगणारा फलकही नाही.

Mahimapur Stepwell 800 Years Old | esakal

पर्यटनाची संधी आणि मागणी

महिमापूरची ही विहीर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते, परंतु प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. या विहिरीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.

Mahimapur Stepwell 800 Years Old | esakal

ब्रिटिशांच्या ताब्यात असलेली महाराष्ट्रातील ‘शकुंतला’ रेल्वे, पाहा १०० वर्षांपूर्वीचे फोटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shakuntala Railway British Ownership | esakal
हेही वाचा -