Anushka Tapshalkar
ओंकाराचा उच्चार केल्याने मेंदू आणि छाती दोन्हीमध्ये कंपनं निर्माण होतात. या कंपनांमुळे मन एकाग्र होतं आणि मनातील विचार कमी होऊन मनाला आणि संपूर्ण आत्म्याला शांती मिळते. त्यामुळे तुम्हाला प्रसन्न आणि उत्तेजित वाटतं.
तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर डोळे बंद करून पाच वेळा लांब श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करा. यामुळे तुमची अस्वस्थता आणि डोक्यातील वाईट विचार दोन्ही दूर होईल.
यामुळे शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्झिन्स) दूर होतात आणि ताण कमी होण्यास मदत होते.
ओंकाराच्या उच्चारणामुळे हृदय सुदृढ राहून रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
ओंकाराचा उच्चार केल्याने पचनशक्ती वाढते.
ओंकारामुळे शरीरात स्फूर्तीचा संचार होतो.
रात्री झोपण्यापूर्वी किंवा व्यायाम करुन झाल्यावर फक्त ३ वेळा जरी ओंकारचं उच्चारण केलं तरी तुमचा थकवा दूर होतो.
ओंकाराच्या नियमित उच्चाराने काही दिवसांतच झोप न येण्याची समस्या दूर होते. म्हणून झोपण्यापूर्वी ओंकाराचा उच्चार करणे आवश्यक आहे.
ओंकाराच्या उच्चाराने फुफ्फुसाचे कार्य सुधारते.
ओंकाराचा उच्चार केल्याने गळ्यात कंपन निर्माण होतात. याचा थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो.