दररोज सूर्यनमस्कार घालण्याचे आहेत 'हे' ८ जबरदस्त फायदे

Anushka Tapshalkar

सूर्यनमस्कार

दररोज सूर्यनमस्कार घातल्याने शरीर व मन दोन्ही तंदुरुस्त राहतात. यामुळे शरीर लवचिक बनते, ताकद वाढते, हृदयाचे आरोग्य सुधारते, तणाव कमी होतो आणि उर्जेची पातळी वाढते.

Surya Namaskar | sakal

लवचिकता

सूर्यनमस्कार घालतं स्नायू आणि सांधे ताणले जातात. त्यामुळे त्यांची लवचिकता सुधारते, शरीर अधिक हलक्या आणि सुलभ हालचाली करू शकतं, शरीराचा कडकपणा कमी होतो आणि शारीरिक हालचाली सहज आणि मोकळ्या होतात.

Body Flexibility | sakal

रोगप्रतिकारशक्ती

सूर्यनमस्कार शरीरातील लिंफटीक प्रवाहास चालना देतात. त्यामुळे शरीर शुद्धीकरणास मदत होते. त्यामुळे आपल्याला सहसा कोणतेही आजार होत नाहीत व रोगप्रतिकारशक्ती भक्कम होते.

Improved Immunity | sakal

पचन

नियमित सूर्यनमस्कार घातल्याने पचन सुधारते, शरीर शुद्धीकरण सुरळीत पार पडते. तसेच शरीराला गरज असलेल्या पोषणतत्वांचे शोषण व्यवस्थित होण्यास मदत होते. याचा परिणाम निरोगी पचनसंस्था प्राप्त होण्यामी होतो.

Improved Digestion | sakal

श्वसन

सूर्यनमस्कार घालताना खोल, नियंत्रित श्वास घेतल्यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि शरीराला अधिक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे श्वसन कार्य सुधारते.

Breathing | sakal

ताण

सूर्यनमस्कार घालताना खोल श्वास आणि हळू हालचालींमुळे मन शांत होते. त्यामुळे ताण कमी होतो, मनातील विचार शांत होतात आणि मन शांत व स्थिर होते.

Stress Free | sakal

हृदयाचे आरोग्य

सूर्यनमस्कार घालताना संपूर्ण शरीराच्या हळू, व एका लयीतील हालचाली खोल आणि नियंत्रित श्वास घेऊन होतात. यामुळे हृदयासाठी आवश्यक ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा सुरळीत होतो. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

Heart Health | sakal

स्नायू

सूर्यनमस्काराच्या वेगवान हालचालींमुळे पोट, पाठ, हात आणि पाय मजबूत होतात. यामुळे शरीराची स्थिरता आणि सहनशक्ती वाढते.

Strong Muscles | sakal

वजन

सूर्यनमस्कारामुळे चयापचय सुधारते. कॅलोरीज गतीने बर्न होतात आणि नियमिततेमुळे वजन आटोक्यात राहते.

Weight Management | sakal

पाठीच्या दुखण्यापासून ते सहनशक्ती वाढवेपर्यंत, ताडासन आहे खूप फायदेशीर

Tadasana (Mountain Pose) | sakal
आणखी वाचा